A money-grabbing gang बँकेची रक्कम लुटणाऱ्या टोळीला उत्तर प्रदेशात पकडले

0

भिवंडी : Zomato Delivery Boy झोमॅटो लिव्हरी बॉयचे टी-शर्ट आणि हेल्मेट घालून बाईकस्वारांनी भर रस्त्यात बँकेची पावणेबारा लाखांची रक्कम पळविण्यात आल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी भिवंडी परिसरात घडली (Bank amount robbery Gang Arrested ) होती. लुटमार करणाऱ्या या टोळीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी तिघा जणांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथून अटक केली आहे. आरोपींच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. Arshad Mohammad Ilyas Mohammad Mansuri, (aged 22 years), Abdul Saeed Abdul Wafa Chaudhary (aged 24 years), Saif Ali Mohammad Mustafa Khan (aged 25 years) अर्शद मोहम्मद इलियास मोहम्म मन्सुरी, (वय 22 वर्षे), अब्दुल सईद अब्दुल वफा चौधरी (वय 24 वर्षे), सैफअली मोहम्मद मुस्तफा खान (वय 25 वर्षे) अशी या तिघांची नावे आहेत. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली होती.
भिवंडी येथील बेसीन कॅथलिक को-ऑपरेटिव्ह बँकचा रोखपाल व त्याचा सुरक्षा सहकारी असे दोघे एका बाईकने बँकेची 11 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कम आयडीबीआय बँक, कल्याण रोड शाखेत भरण्यासाठी जात होते. त्यावेळी ही घटना घडली. भिवंडी-कल्याण मार्गावर पंजाब नॅशनल बँकेच्या समोरील रस्त्यावर त्यांच्या एका दुसऱ्या बाईकने धडक दिली. धडक देणाऱ्या बाईकवरील तरुण झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे टी शर्ट व काळे हेल्मेट घालून होते. काही कळायच्या आतच त्यांनी रोखपालाच्या हातातील रकमेची बॅग हिसकावून घेतली व बाईकने धूम ठोकली. रोखपालाच्या तक्रारीवरुन भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारुंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिवंडी पोलिसांनी या घटनेचे व आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर लुटारू एका टेलरच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळाली. टेलरच्या चौकशीतून आरोपींची नावे व त्यांचे मोबाईल फोन क्रमांक निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासले असता ते उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये असल्याचे आढळून आले. पोलिसांनी स्थानिक एसटीएफच्या मदतीने आरोपी अर्शद मन्सुरी, अब्दुल सईद अब्दुल वफा चौधरी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर सैफअली मोहम्मद मुस्तफा यालाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लुटमारीतील रक्कम जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.