A rare coin of the 12th century 12व्या शतकातील दुर्मिळ नाणे चंद्रपूरच्या इतिहास संशोधकाकडे

0
सोन्याच्या नाण्यावर श्रीरामाची छाप, अयोध्या राम मंदिराला देणार दान
लखनऊ. चंद्रपूर (Chandrapur) येथील इतिहास संशोधक आणि भारतीय सांस्कृतिक संघटक अशोक सिंग ठाकूर (Ashok Singh Thakur) यांनी त्यांच्याकडे १२ व्या शतकातील सोन्याचे नाणे असल्याचा दावा केला आहे. या प्राचीन सोन्याच्या नाण्यावर भगवान श्रीराम हे धनुर्धराच्या रूपात चित्रित (Lord Sri Rama is depicted as an archer on the coin ) करण्यात आले आहेत, तसेच नाण्याच्या मागील बाजूस श्रीराम लिहिलेले देखील दिसत आहे. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील केवळ तीन लोकांकडेच सुमारे 4 ग्रॅम वजनाचे हे दुर्मिळ वर्तुळाकार सोन्याचे नाणे आहे. पहिले नाणे अहमदाबादमध्ये आहे, दुसरे नाणे मुंबईत आहे आणि तिसरे दुर्मिळ नाणे त्यांच्या स्वतःकडे आहे. ठाकूर हे त्यांच्याकडील दुर्मिळ नाने घेऊन लखनौच्या गोमतीनगरमध्ये मुद्रा मेळ्यात सहभागी झाले. प्रदर्शनात आपले सोन्याचे नाणे प्रदर्शित केले. अनेकांनी नाण्यावरील श्रीरामाचे दर्शन घेऊन धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. अयोध्येतील राम मंदिराला दे नाणे भेट देण्याची त्यांची इच्छा आहे.
लक्ष्मणपुरीत प्रथमच दुर्मिळ नाण्याचे दर्शन
प्रथमच हे नाणे लक्ष्मणनगरी म्हणजेच लखनौऊत आणण्यात आले आहे. अशोक सिंह ठाकूर यांनी सांगितले की, जेव्हा अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर राम संग्रहालय बांधले जाईल, तेव्हा ते दान करतील. विग्रहराज हे इतिहासातून गायब झालेले पृथ्वीराज चौहान यांचे आजोबा होते. मुघलांनी ताब्यात घेतल्यावर ही नाणी वितळवली. अडचणींमुळे आपले पूर्वज फक्त तीन नाणी वाचवू शकले. जे आता देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत आणि त्यातील एक त्यांच्याकडे आहे. अकबराने श्रीरामाची छाप असलेले नाणे आणले होते, हे सर्वांनाच माहिती आहे. पण, अकबराचे नाणे येण्याच्या 300 वर्षांपूर्वीच हे नाणे राजपूतांनी सुरू केले होते, जे नंतर मुघलांनी रद्द केले होते.
वारसा जतन करणे हाच उद्देश
अशोक सिंह ठाकूर यांनी सांगितले की, त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक दुर्मिळ नाणे देखील आहे, ज्यावर छत्रपती शिवाजी महाराज कोरलेले आहेत आणि त्यांचे नाव देखील लिहिलेले आहे. ही नाणी आपल्या गौरवशाली इतिहासाचा दाखला देतात. ही आपला वारसा आहेत, त्यांचे जतन करणे हेच आपले कर्तव्य आणि उद्देश असल्याचे ते माणतात.