मुंबईः (mumbai)दहा वर्षापूर्वीच्या अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातील (Jiah Khan Suicide Case) आरोपी व अभिनेता सूरज पांचोली (Actor Aditya Pancholi) याची विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली आहे. ठोस पुराव्यांच्या अभावी सूरज पांचोलीला न्या. ए.एस. सय्यद (A.S. Syed) यांनी त्याला निर्दोष ठरवले. जियाची आई राबिया खान यांनी या प्रकरणी आणखी मुद्दे मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळत या प्रकरणावर निकाल दिला आहे. आता या निकालाला (Rabia Khan)राबिया खान या वरच्या न्यायालयात आव्हान देणार आहेत. जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा राबिया खान यांचा आरोप आहे. 3 जून 2013 रोजी जियाने तिच्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती.
जियाची आई राबिया यांच्या तक्रारीवरून तिचा प्रियकर अभिनेता सूरज पांचोली याला (arrested)अटक करण्यात आली होती. त्यांनी सूरजवर जियाला(suicide) आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. तब्बल 10 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आला. शुक्रवारी निकाल असल्याच्या पार्श्वभूमीवर सूरज पांचोली हा त्याची आई व ज्येष्ठ अभिनेत्री झरीना वहाब यांच्यासह विशेष न्यायालयात दाखल झाला होता. निकाल येण्यापूर्वी सूरजची आई आणि अभिनेत्री जरीना वहाब यांनी लोकांना आपल्या मुलासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. “या निर्णयासाठी आम्ही 10 वर्षे दीर्घकाळ वाट पाहिली आहे. ही 10 वर्षे माझ्या मुलासाठी नरकासारखी होती. जेव्हा तो माझ्याकडे पाहतो तेव्हा मला त्याच्या वेदना जाणवतात. तो निर्दोष आहे, हे मला माहिती आहे. पण मी काहीही करू शकत नाही. माझा अजूनही देवावर पूर्ण विश्वास आहे”, असेही त्या म्हणाल्या.