अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिला इशारा!

0

(Pune)पुणे : “ज्यांना माझ्यासोबत काम करण्याची इच्छा त्यांनी माझ्यासोबत यावे. मात्र, उगीच दोन्ही बाजुंना राहु नये, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना त्यांचे नाव न घेता बजावले. त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच” असे म्हणत अजित पवार यांनी थेट दंड थोपटले. (Ajit Pawar on Amol Kolhe) राष्ट्रवादीचे खासदार कोल्हे यांनी दोन्ही बाजुंना राहण्याची भूमिका बाळगली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांना निर्वाणीचा इशारा दिल्याचे मानले जात आहे.

अजित पवार म्हणाले, एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचे रान केले. आता आम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार दिला तर आम्ही तो उमेदवार निवडून आणणारच, अशी गर्जनाही अजित पवार यांनी केली. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha Constituency) खासदार अमोल कोल्हेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले, एका खासदाराचे मधल्या काळात मतदारसंघाकडे लक्ष नव्हते. जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिले असते, तर खूप बरे झाले असते. तो एक ते दीड वर्षापूर्वी राजीनामा द्यायला तयार होता. मी एक कलावंत आहे आणि माझ्या सिनेमावर या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ लागला आहे. मी काढलेला सिनेमा शिवरायांवर असला तरी तो चालला नाही. माझ्या एकूण प्रपंचावर आणि आर्थिक गोष्टीवर त्याचा परिणाम होत असल्याचे त्या खासदाराने सांगितले होते. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटील यांनी जीवाचे रान केले, असे अजित पवार म्हणाले.