केदारांचे रुग्णालयात भरती होणे संशयास्पद-देशमुख

0

 

(Nagpur)नागपूर : काँग्रेसचे नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांना शिक्षा सुनावली गेल्यानंतर त्यांनी रुग्णालयात दाखल होणे संशयास्पद आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात ज्या पद्धतीने ललित पाटीलला तेथील अधिष्ठातांनी कारण नसताना दाखल करून घेतले होते, तसाच हा प्रकार असल्याचा आरोप भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे. एवढेच नाही तर या प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण विभागाने चौकशी करावी, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

आशिष देशमुख म्हणले, २२ तारखेला न्यायालयाने सुनील केदार यांना शिक्षा सुनावली त्या दिवशी सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत सुनील केदार यांचे आरोग्य चांगले होते. न्यायालयातून निघताना त्यांनी कार्यकर्त्यांचा जल्लोषही स्वीकारला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी त्यांची तब्येत बिघडली आणि आता ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या बहुतांशी सर्व चाचण्या ते योग्य असल्याचे सांगत असून या सर्व प्रकाराची चौकशी वैद्यकीय शिक्षण विभागाने करावी. ज्या प्रकरणात शेतकऱ्यांना २२ वर्षानंतर न्याय मिळाला, त्या प्रकरणात शिक्षा झालेल्या व्यक्तीला अशा पद्धतीने रुग्णालयात दाखल करून घेऊन तुरुंगवासापासून थांबवणे योग्य नसल्याचे मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केले आहे. सुनील केदार यांची वृत्ती नेहमीच कायद्याच्या विरोधात राहिली आहे. त्याची पुनरावृत्ती या प्रकरणात होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.