सर्व्हेने महाराष्ट्रात वाढविल्या महायुतीच्या चिंता!

0

(New Dellhi)नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीला जोरदार फटका बसण्याचे संकेत सी व्होटरच्या सर्वेक्षणातून देण्यात आले आहेत. त्यामुळे महायुतीच्या चिंता वाढल्या आहेत. सर्वेक्षणानुसार, महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला ४ टक्के अधिक मते मिळू शकतात, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला २६ ते २८ आणि महायुतीला १९ ते २१ जागा मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अन्य पक्षांना २ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आलाय. (C Voter Survey on LS Election)
सध्याच्या परिस्थितीनुसार हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. ओपिनियन पोलमध्ये इंडिया आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली असती तर महायुतीला १९ ते २१ जागा मिळतील. तर इंडिया आघाडीला २६ ते २८ जागा मिळतील. अन्य पक्षांच्या खात्यात ०- २ जागा जाण्याची शक्यता आहे. राज्यातील एकूण मतांपैकी ३७ टक्के मते महायुतीला तर ४१ टक्के मते महाआघाडीच्या वाट्याला जाऊ शकतात. अन्य पक्षांना २२ टक्के मते जाऊ शकतात, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.