पुणे : विरोधी पक्ष नेते अजित पवार पुन्हा एकदा प्रसार माध्यमांच्या चर्चेत आले. पवारांनी आगामी दोन दिवसांचे दौरे रद्दे केले व ते नॉट रिचेबल झाल्याची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये सुरु (Leader Of Opposition Ajit Pawar) झाली. मात्र, अखेर पवारांनी कारण नसताना बदनामी न करण्याचे आवाहन प्रसार माध्यमांना केले. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास (AJIT PAWAR)अजित पवारांचे पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या शोरुमच्या उद्घाटनाला सपत्निक दर्शन झाले व त्याचवेळी चर्चांना पूर्णविराम मिळाला. यावेळी बोलताना त्यांनी प्रसार माध्यमांना खडे बोल सुनावले. “मला इतके वाईट वाटत होते की अजित पवार (Not Reachable’)‘नॉट रिचेबल’ वगैरे काही पण दाखवत होते. तुम्ही आधी खात्री करुन घ्या. कारण नसताना एखाद्याची किती बदनामी करायची. आम्ही पब्लिक फिगर असल्याने तुम्हाला अधिकार आहे. पण, शेवटी आम्ही माणूसच आहोत”, असे ते म्हणाले.
पवार म्हणाले की, जागरण, दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास व्हायला लागतो. हे आजचे नाही तर नेहमीचे आहे. मला कसेतरी व्हायला लागले. त्यामुळे मी घरी जाऊन डॉक्टरांकडून गोळ्या आणून घेतल्या आणि शांतपणे झोपलो, असे स्पष्टीकरण (SHARAD PAWAR)पवारांनी दिले. शुक्रवारी दुपारी बारामती होस्टेल येथे नियोजित बैठका उरकल्यानंतर अजित पवार फुरसुंगी येथे एका कार्यक्रमाला रवाना झाले होते. मात्र कार्यक्रमाला न जाता हडपसर इथूनच त्यांनी यूटर्न घेऊन सगळे दौरे रद्द केल्याची चर्चा माध्यमांत आली. शनिवारी सकाळी नियोजित कार्यक्रमानुसार त्यांनी एका सराफा दुकानाच्या उद्धाटन कार्यक्रमात हजेरी लावली आणि उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला.
जेपीसी चौकशीवर..
दरम्यान, अदानी प्रकरणी(JPC)जेपीसी चौकशीवर बोलण्यात अजित पवारांनी नकार दिला. शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी एखाद्या विषयावर भूमिका मांडली की त्यावर आम्ही कोणी काही बोलू शकत नाही. तीच पक्षाची भूमिका असते. त्यामुळे गौतम अदानी जेपीसी चौकशी प्रकरणावर त्यांची भूमिका अंतिम असेल, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.