तेजपूरः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी(ASSAM) आसाममधील तेजपूर एअर फोर्स स्टेशनवरून सुखोई 30-एमकेआय फायटर जेटने उड्डाण (President Draupadi Murmu on Sukhoi-40-MKI) केले. यापूर्वी 2009 मध्ये देशाच्या 12व्या राष्ट्रपती (Pratibha Devi Singh Patil)प्रतिभा देवी सिंह पाटील यांनीही सुखोईमध्ये उड्डाण केले होते. प्रतिभा पाटील यांनी सुखोई उडवून दोन विश्वविक्रम केले होते. त्या सुखोई उडविणाऱ्या कोणत्याही देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. तसेच त्या सुखोई उडविणाऱ्या कोणत्याही देशातील सर्वात वृद्ध महिला देखील ठरल्या. तेव्हा प्रतिभा पाटील 74 वर्षांच्या होत्या. त्यांचे नाव गिनीज बुकमध्येही नोंदवले गेले आहे.
प्रतिभा पाटील यांच्यापूर्वी माजी राष्ट्रपती(Dr. APJ Abdul Kalam)डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती असताना 8 जून 2006 रोजी सुखोई उडवले होते. फायटर जेट उडविणारे ते देशाचे पहिले राष्ट्रपती होते.
सुखोई उड्डाणासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांनी खास वैमानिकाचा गणवेश परिधान केला होता. उड्डाणानंतर काही वेळातच त्यांनी यशस्वी लँडींगही केले. त्या आसामच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून राज्यपाल (Gulab Chand Kataria)गुलाबचंद कटारिया आणि मुख्यमंत्री हेमंत (Vishwa Sharma)विश्वा शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले.