-पटोले यांचीच व्हावी चौकशी, पुन्हा टीकास्त्र
नागपूर -मला काँग्रेस पक्षातून काढण्यात आलेले नाही.निलंबन करण्यात आले आहे. माझी बाजू ऐकल्यानंतर मला पक्ष काढणार नाही असा विश्वास व्यक्त करतानाच माजी आमदार डॉ आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष (nana patole) नाना पटोले यांच्या चौकशीची मागणी करीत खळबळ उडवून दिली आहे. पटोले यांनी अध्यक्षपद का सोडले, तिथूनच या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, यानंतरच मविआचे सरकार पडले व पुढील सर्व घडामोडी घडल्या असा दावाही त्यांनी यावेळी केला. आपण काँग्रेस अजून सोडलेली नाही त्यामुळे हिंगणा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लढण्याचा प्रश्नच येत नाही, कुठल्याही पक्षात जाण्याचा तूर्तास विचार केलेला नाही असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ,’शंखनाद’ शी बोलताना स्पष्ट केले .
गेले काही दिवस देशमुख राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा जोरात आहे. पुणे येथे त्यांनी अजित दादा पवार यांची भेट घेतल्याचीही चर्चा रंगली. या सर्व पार्श्वभूमीवर आज त्यांनी प्रसार माध्यमांशी आपले मन मोकळे केले. देशमुख म्हणाले की माझ्या विरोधात हे सर्व षडयंत्र आहे. नाना पटोले यांच्यावर संशयाची सुई आहे. मविआचे सरकार पडल्यापासून हा सर्व प्रकार सुरू आहे. पक्षाने मला दिले तशी कारणे दाखवा नोटीस पटोले यांनाही देणे गरजेचे आहे. मुळात त्यांनी अध्यक्षपद का सोडले, याविषयी समितीमार्फत चौकशी केली गेल्यास ‘दूध का दूध पाणी का पाणी’ होईल असेही ते त्यावेळी म्हणाले. (I have not been removed from the party, I will not go to another party-Dr Ashish Deshmukh)