नागपूर : सलग तीन चार दिवस अकोला, अमरावती आणि नागपूर, गोंदियाल या मोसमातील सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. आज बुधवारी अमरावती आणि वर्धा येथे सर्वाधिक 42.4 अंश से.तापमानाची नोंद झाली. या खालोखाल ब्रह्मपुरी,चंद्रपूरला 42.2 तर नागपूरला 41.8 असे तापमान होते. दुपारनंतर तसेच सायंकाळी सिव्हील लाईन्स, राजभवन, काटोल रोड,कोराडी रोड अशा काही भागात पावसाच्या सरीनी पुन्हा उकाडा वाढविला. रोज दुपारी 12 नंतर उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. उष्माघाताच्या घटना वाढल्याने शहरातील अनेक चौकातील सिग्नल्स दुपारच्या वेळी वाहतूक पोलिसांनी बंद केले आहेत. आज विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तापमानाचा विचार करता अकोला 41.8, गडचिरोली (41.8), वाशीम (40.6), बुलडाणा (37.8) याप्रमाणे तापमानाची नोंद झाली. ढगाळ वातावरण, पावसाच्या हजेरीने विदर्भात काहीसे तापमान कमी झाल्याचे अनुभवास येत आहे.