अध्यक्ष श्री . नारायण जोशी
बालाजी सरोज भावकाव्य समुहाचे २ रे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन हे सारस्वतांच्या वाटेवरील महत्वाचे पदचिन्हहोय , असे विचार संमेलनाध्यक्ष जेष्ठ लेखक श्री . नारायण जोशी यांनी व्यक्त केले .
बालाजी सरोज भावकाव्य समुहाचे राज्यस्तरीय दुसरे मराठी साहित्य संमेलन दि . १४ मे २०२३ रोजी रविवारी मा. दत्ताजी मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अत्रे ले आऊट नागपूर येथे अतिशय उत्साहात पार पडले .
आणि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ञ श्री नारायणराव जोशी होते . अध्यक्ष पुढे म्हणाले की , अशी विभागीय संमेलने ही आजची गरज आहे .
संमेलनाचे उद्घाटक होते सिनियर सिटीझन कौंसिल चे सचिव श्री . सुरेश रेवतकर यांनी संमेलनासाठी मदत करण्यास सदैव तयार आहे असे म्हणून शुभेच्छा दिल्या . नांदेडचे प्रा. डॉ. आबासाहेब कल्याणकर आणि येळाहरीचे सरपंच , सामाजिक कार्यकर्ते मा .सचिन इंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपलब्ध होते . यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या .
मा . दत्ताजी मेघे इन्स्टिट्यूट चे श्री . मिश्राजी विशेष अतिथी उपस्थित होते . खऱ्या साहित्यिकांना मंच मिळायला हवा असे विचार त्यांनी मांडले .
सर्वप्रथम दीप प्रज्वलनानंतर सौ .विद्या बोरकर यांनी सरस्वती स्तवन केले . यावेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
समुह संस्थापक आणि स्वागताध्यक्ष अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या धनी सौ . सरोज अंदनकर यांनी प्रास्ताविक केले
संमेलनाची भूमिका विशद केली.
त्यानंतर सौ.सरोज ताई यांच्यावरील प्रेमापोटी साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट साधून सौ.स्मिता संतोष दीक्षित,सौ.वर्षा विजय देशपांडे सौ.रंजना अनिल काटकर आणि अनेकांनी त्यांचा सत्कार करून भेट वस्तू दिल्या
प्रथम साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष गझलकारा प्रा. सुनंदा पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवीन अध्यक्षांच्या हाती सुपूर्द केली . यावेळी मान्यवरांच्या हस्ते गझलनंदा यांच्या लोकव्रत प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ” सावली अंबराची ” या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी प्रा . सुनंदा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
तसेच वीणा रारावीकर यांच्या ” गुजगोष्टी शत शब्दांच्या ” या पुस्तकाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले .
या प्रसंगी कै . डॉ . सितारामपंत अंदनकर स्मृती कथासंग्रह पुरस्कार , कै . लक्ष्मीकांत दीक्षित स्मृती काव्यसंग्रह पुरस्कार , कै . शकुंतला दीक्षित स्मृती प्रथम प्रकाशन
स्पर्धा पुरस्कारांचे वितरण झाले .
यावेळी सिने कथा लेखिका मा. सौ . माधुरी अशिरगडे यांचाही सत्कार झाला .
यानंतर गझलनंदा यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा झाला . श्रेत्यांची दाद घेत अनेक गझलकारांनी आपल्या गझल सादर केल्या .
नांदेडचे प्राचार्य डॉ. आबासाहेब कल्याणकर यांच्या अध्यक्षते खाली आणि संमेलनाध्यक्षांच्या उपस्थितीत निमंत्रितांचे बहारदार कविसंमेलन पार पडले . यावेळी ४० कवींनी आपल्या कविता सादर केल्या . जालना येथील दिव्यांग कवी आकाश देशमुख यांची संमेलनाला उपस्थिती हा या संमेलनाचा वैशिष्ट्यपूर्ण भाग होता .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा मांजरखेडे वगरकर आणि प्रा. भारती दवणे यांनी केले .
सह आयोजक श्रीराम संजय अंदनकर आणि सहकारी श्री.संतोष दीक्षित चामोर्शी यांच्या कार्यक्रमाच्या यशस्वितेत प्रमुख भूमिका होत्या .
या एकदिवसीय संमेलनात श्रोत्यांची आणि संमेलनाध्यक्षासून सर्व निमंत्रितांची शेवटपर्यंत उपस्थिती ही विशेष बाब होती .
संमेलनाला उपस्थित हे संमेलन संपन्न झाले