गूढ आवाजासह भूकंपाचा धक्का

0

वसमत तालुक्यात अनेक गावे हादरली : गावकरी झोपेतून उठून बसली
हिंगोली. भूगर्भातून गुढ असा आवाज (Mysterious sounds from underground ) येऊ लागला आणि अचानक धरणीकंपाचा सौम्य धक्का (Earthquake) जाणवला. हिंगोलीतील वसमत तालुक्यात (Wasmat taluk of Hingoli ) रविवारी पहाटे ४.३१ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर गाढ झोपेत असमआरे गावकरी खडबळून जागे झाले. भूकंपाचा धक्का अत्यंत सौम्य स्वरूपाचा होता. तालुक्यात कुठेच हानी व नुकसान झाले नसल्याची माहिती तहसिल प्रशाशनाने दिली. ६ ते ७ वर्षापासून सतत भुकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांत आता भिती व्यक्त केल्या जात आहेत. तालुक्यातील बहुतांश गावाना भुकंपाचा धक्का बसला आहे. भुकंपाची नोंद झाली का याची माहिती घेणे चालू आहे. भुकंपाच्या धक्क्याने हानी व नुकसान झाले नाही, महसुल पथके पाहाटपासुन सर्वत्र फिरुन माहिती घेत आहेत, असे तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी सांगितले.
वसमत तालुक्यातील वसमत, कुरुंदा, गिरगाव, कवठा, वर्ताळ, डोणवाडा, सेलू, पार्डी, कोठारी, पांग्रा शिंदे, वापटी, कुपटी, शिरळी यासह औढानागनाथ व कळमनुरी तालुक्यातील ही अनेक गावांना ८ जानेवारीच्या पहाटे ४.३१ वाजताच्या सुमारास भूगर्भातून मोठा आवाज येत जमिन हादरली. येथील तिन्ही तालुक्यातील अनेक गावांना गत ६ ते ७ वर्षांपासून भुकंपाचे धक्के सतत जाणवत आहेत. यापूर्वी दोन वेळेस भुकंपाची नोंददेखील झाली आहे. सतत भुकंपाचे धक्के जाणवत आसल्याने नागरिकांत भिती व्यक्त केल्या जात आहेत. रविवार रोजी पहाटे जाणवलेल्या भुकंपाच्या धक्कयात कोठेही हानी व नुकसान झाली नसली तरीही नागरिक भयभीत झाले आहेत. भूकंपापेक्षाही गुढ आवाजाचीच चर्चा सर्वत्र आहे. यापूर्वी लातुरच्या किल्लारीत मोठा भूकंप झाला होता. त्यात अनेकांना जीवही गमवावा लागला. या घटनेच्या आठवणी आणि भिती आजही महाराष्ट्राच्या सृतीत कायम आहेत. त्यातच वसमत भागात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने लातुरच्या घटनेची पूनरावृत्तीतर होणार नाही ना, अशी धस्ती व्यक्त केली जात आहे.