
(Wardha)वर्धा– अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी खासदार रामदास तडस यांच्या कार्यालयावर धडक दिली. रामदास तडस यांच्याकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी साकडे घातले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा 23 दिवसांपासून राज्यव्यापी संप सुरूच आहे. आयटक व सिटू या दोन संघटनांच्या नेतृत्वात हा राज्यव्यापी संप असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळायला पाहिजे, दरमहा पेन्शन मिळाले पाहिजे, आजारपणाच्या रजा मिळाल्या पाहिजेत या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारकडे मांडून पाठपुरावा करेल असे आश्वासन यावेळी खासदार रामदास तडस यांनी दिले.लवकरात लवकर तोडगा काढा अन्यथा जेलभरो आंदोलन करणार असा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांतर्फे दिलीप उटाणे, महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समिती निमंत्रक यांनी दिला.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















