बेईमानी नाही झाली तर निकाल आमच्या बाजूने – विजय वडेट्टीवार

0

 

(Nagpur)नागपूर – निवडणूक संदर्भात सर्व्हे काय आला हे मी पाहिलेलं नाही. मध्यप्रदेशचा सर्व्हे हा आमच्याच बाजूला आलेला होता. यावेळीही थोडी बेईमानी झाली नाही तर निकाल आमच्या बाजूने लागेल असा दावा (Leader of Opposition Vijay Wadettiwar)विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, दुसऱ्यांचे घर जाळून स्वतःचं घर तुम्ही सजवतात हे लोकांना कधीही आवडणार नाही. त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगावा लागेल.दुसऱ्यांचे पक्ष फोडून, चिन्ह घेऊन, जी बेइमानी झाली पक्ष संपवण्याचे कामं झालं. लोकांची घर फोडायची आणि स्वतःचं घर सजवायचं. लोकं हेच स्वीकारणार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून या सगळ्याचे उत्तर जनता देईल. प्रशासन, सरकार मिळून भ्रष्टाचार करत आहे. त्यामुळे प्रशासन जनतेचे काम करण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी अजिबात तत्पर नाही. लोकांचे काम पैसे घेतल्याशिवाय न करणं हे सगळं सर्रास सुरू आहे.एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे, मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतात त्यांचं प्रशासन ऐकत नसतील. अधिकारी ऐकत नसतील,तर मग महाराष्ट्रात काय ओलवेल आहे. गरीब माणसाने कुणाकडे बघायचं असा सवाल केला.

(Prakash Ambedkar)प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं यावर मी उत्तर देणार नाही. प्रकाश आंबेडकर यांची सभा नागपुरात होत आहे. ती चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे.वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी व्हावी, अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे.आघाडी झाल्यास महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची खूप मोठी संधी आहे. आमची सगळ्यांची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत यावे असेही वडेट्टीवार म्हणाले. सुनील केदार संदर्भात बोलताना विरोधकांना संपवण्याचा विडाच सरकारने उचललेला आहे

त्यांना दोषी ठरवणे. त्यांना संपवणे, अशा पद्धतीचे कायदे करून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे. सुधीर पारवे आमदार असताना स्थगिती मिळेपर्यंत त्यांची आमदारकी कायम होती ती 24 तासात रद्द केली नाही. बच्चू कडू यांच्या बाबतीतही तेच झालं. सुनील केदार यांच्या संदर्भात मात्र 24 तासात कारवाई होते.जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव झाला. ग्रामीण भागात (Sunil Kedar)सुनील केदार यांनी भाजपला टिकू दिले नाही. त्यामुळे त्यांना संपवण्याचे काम करत हा बदला घेण्याचा प्रयत्न झाला असा आरोप केला.

हिंदू गर्जना सभा याकडे लक्ष वेधले असता कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. आसाराम असो घासाराम असो, एक ना एक दिवस अडचणीत येणार आहे. कायद्यानेच काम होईल.कायद्यावर विश्वास आहे की नाही हे त्यांनी सांगावे. अजित दादा जे म्हणताय ते बरोबर आहे. कारण त्यांचे पाप धुतलेले आहे. त्याचे डाग स्वच्छ धुतले गेल्याने दुसऱ्यांच्या अंगावरचे डाग दिसणे कमी झाले आहे असा टोला विजय वडेट्टीवार यांनी दिला.