आंबेडकरांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

0

(nagpur)नागपूर-इंडिया आघाडीत प्रवेश मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या अस्वस्थेतूनच आघाडीचे नेते (Prakash Ambedkar)प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात लोकसभेच्या ४८ जागा लढविण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना आपल्या सहकाऱ्यांना दिल्या आहेत. भाजपविरोधात लढण्यापेक्षा केवळ कुटुंबांना प्राधान्य दिल्यास त्यांच्यात एकी होणार नाही, अशी आगपाखडही त्यांनी इंडिया आघाडीवर केली आहे. दरम्यान, सोमवारी नागपुरात कस्तुरचंद पार्कवर आयोजित सभेत आंबेडकर नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

इंडिया आघाडीत कसेही करून प्रवेश मिळविण्याचे प्रकाश आंबेडकरांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी सकारात्मक असली तरी अद्याप काँग्रेसचा निर्णय होत नसल्याने निर्णय घेण्यास विलंब होत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचीही अस्वस्थता वाढत आहे. सातत्याने स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेणारे आंबेडकर हे इंडिया आघाडीत प्रवेश मिळविण्यास इच्छूक आहेत. दोन आघाड्यांच्या लढाईत वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढण्यास फारसे काहीच साध्य करता येणार नाही, हे आंबेडकर जाणून आहेत. त्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतल्याचे मानले जात आहे.

मात्र, काँग्रेसकडून निर्णय होत नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढत असून त्यातूनच आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना ४८ जागा लढविण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सोमवारी नागपुरात होणाऱ्या सभेत प्रकाश आंबेडकर नेमकी काय भूमिका जाहीर करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.