देशमुख म्हणतात,सारे काही ठरवूनच !

0

 

नागपूर NAGPUR – मुळात विरोधकांना केवळ महाराष्ट्रात नव्हे तर बाहेरील प्रांतातही त्रास दिला जात आहे.हे ठरवून सुरू असून विरोधकांना त्रास दिला जात आहे. केंद्रीय एजन्सी टार्गेट करत आहेत असा आरोप माजी गृहमंत्री अनिल ANIL DESHMUKH  देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केला. इडी कार्यालयात आ रोहित पवार गेल्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्व, पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. हे महाराष्ट्रातच नाही, तर दिल्लीत केजरीवाल, बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनाही त्रास दिला जात आहे.

आ रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढली, युवक,शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली म्हणूण ही कारवाई आहे. मला देखील त्रास दिला, संजय राऊतांना त्रास दिला. लोक रस्त्यावर आले तेव्हा गेले नाही. याची सुरुवात शरद पवार यांच्यापासून झाली. दुसरीकडे भाजपच्या एकतरी नेत्यांवर कारवाई केली का? असा सवाल करतानाच ते कोणालाही अटक करू शकतात, अटक झाली की बेल होत नाही. एकंदरीत विरोधकांच तोंड बंद करण्याचे काम सुरू आहे असेही देशमुख म्हणाले.