तीन आरोपींना अटक
(Nagpur)नागपूर :पावसाळी नाल्यांची सफाई करणा-या मनपाच्या दोन कर्मचा-यांवर तीन युवकांनी तलवार आणि गुप्तीद्वारे हल्ला करून जखमी केले. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आल्याने आरोपी तीन युवकांना अटक करण्यात आल्याची माहिती (Dharampeth Zone Assistant Commissioner Prakash Varade)धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी दिली.
शनिवारी धरमपेठ झोन अंतर्गत हिल रोड यशवंत स्टेडियम येथे झोनच्या लोककर्म विभागाचे सातपुते व आरोग्य विभागाचे विक्रम चव्हाण हे जेसीबीच्या माध्यमातून पावसाळी नाली सफाई करीत होते. दुपारी २ वाजता दरम्यान तीन मद्यधुंद युवक आले व त्यांनी काम करीत असलेल्या कर्मचा-यांना शिविगाळ केली. कर्मचा-यांनी या युवकांना विरोध केला. यानंतर तीनही युवक परत गेले. धारधार तलवार व गुप्तीसह कर्मचा-यांना मारण्यास धावले.
युवकांच्या हल्ल्यातून बचाव करीत असताना सातपुते यांच्या हाताची बोटे कापली गेली तर विक्रम चव्हाण यांच्या डाव्या हाताला मार लागला. दोन्ही कर्मचा-यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेउन सदर घटनेची माहिती देत तक्रार नोंदविली.