नागपूर : हल्ल्याचे जे कटकारस्थान रचलं गेलं ते चेंबुरला निलेश पराडकर यांच्या ऑफिसमध्ये रचलं गेलं. निलेश पराडकर हा उबाठा गटाचा माताडी कामगार सेलचा पदाधिकारी आहे. ज्या दिवशी निलेश पराडकर यांना अटक होईल त्यावेळेस संजय राऊत आणि सुनिल राऊत यांचे कनेक्शन समोर येईल असा दावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज पत्रपरिषदेत बोलताना केला.
बी.आर.एस सारखे पक्ष निवडणूक आली की, कुत्र्याच्या छत्र्यांसारखे उगवतात आणि पावसाळा गेला की निघून जातात. आमचा सध्या पक्षबांधणीवर जोर आहे.पक्षवाढीसाठी मनसे काम करत आहे.पुर्ण ताकदीने विदर्भात आगामी निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत त्यादृष्टीने तयारी सुरु आहे. मात्र,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होतील हे ब्रम्हदेवालाच माहित असु शकते असा टोला सरकार आणि विरोधकांना लगावला. राज ठाकरे यांच्या बॅनर बाजी बाबत बोलताना
“भावी” हा शब्द एक नवी फॅशन झाला आहे. त्यामुळे आकडे असल्याशिवाय भावीला काही अर्थ उरलेला नाही असेही ते म्हणाले.
















