आशीष देशमुख राष्ट्रवादीच्या वाटेवर? काँग्रेसकडून कारवाईची शक्यता

0

नागपूरः (NAGPUR)काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करणारे नेते आशीष देशमुख यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीला ते काय उत्तर देतात, याबाबत उत्सूकता असतानाच आता आशीष देशमुख हे राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. (Ashish Deshmukh likely to join the NCP) आशिष देशमुख हे लवकरच नागपुरात राष्ट्रवादीचा मेळावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार देखील उपस्थित राहतील, असेही सांगितले जात आहे.
आशीष देशमुखांना काँग्रेसच्या अनुशासन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (NANA PATOLE)नाना पटोले यांच्यावर ते सातत्याने गंभीर आरोप करत आहेत. तसेच काँग्रेसच्या नेतृत्त्वावरही सवाल उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आशीष देशमुख हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात देशमुख यांच्याकडून अधिकृतरित्या कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांकडून हे संकेत मिळत आहेत. अलिकडेच (SHARAD PAWAR)शरद पवार हे नागपुरात येऊन गेले. यावेळी त्यांची देशमुख यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.