शिंदे कुटुंबाने देशाशी गद्दारी केल्याची रमेश यांची टीका, ज्योतिरादित्य यांचा पलटवार

0

नवी दिल्लीः स्वातंत्र्यपूर्व इतिहासाचे दाखले देत शिंदे कुटुंबाने देशाची गद्दारी केल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांच्यावर केला. शिंदे यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून हा वाद सुरु झाला. आता त्याला ज्योतिरादित्य शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. जयराम रमेश यांनी १८५७ चे (1857 War of Independence) वीर योद्धा(Tatya Tope) तात्या टोपे यांच्या वंशजांनी लिहिलेले पुस्तक वाचावे, असा पलटवार शिंदे यांनी केलाय. तात्या टोपे यांचे वंशज पराग टोपे यांनी लिहलेल्या ‘ऑपरेशन रेड लोटस’ (Operation Red Lotus)या पुस्तकात आम्ही मराठे-शिंदे, पेशवे आणि झाशीचे नेवाळकर इंग्रजांच्या विरोधात एकत्र होतो व मराठा आजही एकत्र आहे. कृपया तोडफोडीचे राजकारण बंद करा, असा सल्ला त्यांनी रमेश यांना दिलाय

.
ज्योतिरादित्य शिंदे(Jyotiraditya Shinde) यांनी (rahul gandhi )राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली. विरोधी पक्षाच्या एका नेत्याने पूर्ण समाजाला चोर म्हणे हा त्यांचा अपमान आहे. (congress)काँग्रेसने आमच्या वीर सैनिकांच्या शौर्याचे पुरावे मागितले होते. सीमाभागात चीनने आमच्या सैनिकांना मारहाण केल्याचे विधानही करण्यात आले होते. देशाविरोधात काम करणे हीच काँग्रेसची विचारधारा उरली आहे, अशी टीका ज्यातिरादित्य शिंदे यांनी केली होती. यावरून हा वाद सुरु झाला आहे. याला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रत्युत्तर दिले होते. (shinde family)शिंदे कुटुंबाने देशाशी गद्दारी केल्याचा आरोप करताना जयराम रमेश यांनी (swatantra Savarkar)स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकाचा दाखला देत इतिहास वाचवण्याचा सल्ला ज्योतिरादित्य शिंदे यांना दिला होता.

 

चिकन साते विथ पीनट सॉस आणि मोतीचुर रबडी पर्फेत|Chicken Satay With PeanutSauce|Motichur Rabdi parphet