
चंद्रपूर–माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे. त्यांनी अचानक का निर्णय घेतला माहित नाही. माझ्याशी चर्चा झाली नाही असे मत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
मी २००७ पासून मी त्यांच्या बरोबर काम केले आहे. कदाचित म्हणूनच चर्चा होत आहे ते गेले म्हणून विजय वडेट्टीवार पण जातील, पण त्यात तथ्य नाही, मी मतदारसंघात फिरत आहे असेही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
माझ्या भोकर विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा आज विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.यासोबतच कॉंग्रेस सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलाय. कॉंग्रेसमध्ये होतो तेव्हा प्रामाणिकपणे काम केले.पुढील राजकीय भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करेल.भाजपात जाण्याचा अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री काँग्रेसला रामराम ठोकणारे अशोक चव्हाण यांनी केले. आज सकाळपासून त्यांच्या व इतर काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्याची, भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले आहे. चव्हाण म्हणाले, पक्ष सोडायला कारण पाहिजेच असं नाही, असं मला वाटतं. वेगळा पर्याय हवा होता म्हणून राजीनामा दिलाय .मला पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही. यासोबतच मी कॉंग्रेस आमदाराबरोबर गोष्टी केल्या नाहीत, माझा तसा हेतू नाही.हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.कोणत्याही पक्षाशी चर्चा केलेली नाही. राज्याचा मुख्यमंत्री असताना कोणत्याही आमदाराशी भेदभाव केला नाही पक्षाने मला मोठं केलं, मी सुद्धा पक्षासाठी खूप केलंय असेही अशोक चव्हाण यांनी प्रथमच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनी सुद्धा त्यांचा पदाचा राजीनामा दिला असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. जे जे काही मला पद मिळाले ते फक्त अशोक चव्हाण यांच्यामुळेच. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे मी सर्व पदाचा राजीनामा दिला आहे आणि भेटीसाठी आलो आहे, असे अमर राजूरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत
नाचणीचे चॉकलेट बनविण्याची सोपी पद्धत | Nachani Chocolate | Shankhnaad News