Home Top News अयोध्येत आ बच्चू कडू यांचा अडवला ताफा

अयोध्येत आ बच्चू कडू यांचा अडवला ताफा

0

अयोध्या- आमदार बच्चू कडू शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन अयोध्येत दाखल झाले. लता मंगेशकर चौकात बच्चू कडू यांची सभा होणार आहे. सभेच्या १ किमी आधीच पोलिसांनी वाहनांचा ताफा अडवला. केवळ पाच वाहने घेऊन जाण्यास पोलिसांनी परवानगी दिली यामुळे पोलीस आणि स्थानिक कार्कर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

आ बच्चू कडू यांचे मेरा देश मेरा खून.. अभियान

नागपूर- आजपासून दोन दिवस आमदार बच्चू कडू अयोध्या दौऱ्यावर आहेत. नागपूरमार्गे ते लखनौला गेले त्यांचे जंगी स्वागत झाले. रवाना होण्यापूर्वी आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाले. आ बच्चू कडू प्रभू रामाचे दर्शन घेणार आहेत, जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहेत. प्रभू रामचंद्राला कापूस, तूर ,सोयाबीनचा प्रसाद चढवणार असून आपण सरकारला बुद्धी दे अशी ही प्रार्थना करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळावं यासाठी आमची लढाई सुरू असून शहिद आणि शेतकऱ्यासाठी आम्ही हे ‘मेरा देश मेरा खून हे अभियान’ राबवणार असून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू,मुस्लिम, दलित या सगळ्यानी बलिदान दिले आहे यावर आमदार बच्चू कडू यांनी भर दिला.