अमृत फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न, काय आहे प्रकरण?

0

 

मुंबई : उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला असून अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून अनिक्षा नामक महिला डिझायनर व तिच्या वडिलांविरुद्ध मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीत लाच देण्याचा प्रयत्न केल्यासह धमकी व कट कारस्थानाचाही उल्लेख आहे. ((Amruta Fadnavis files FIR against designer offering Rs 1 crore)). यासंदर्भात २० फेब्रुवारी रोजी मलबार हिल पोलिस ठाण्यात अमृता यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात कलम 120, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
मलबार हिल पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत अमृता फडणवीस यांनी नमूद केलेय की, अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर 2021 साली पहिल्यांदा भेट झाली होती. अनिक्षाने सांगितले की, ती कपडे आणि दागिन्यांची डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेले कपडे आणि दागिने सार्वजनिक कार्यक्रमात घालावे, अशी विनंती तिने केली होती. यानंतर सागर बंगला आणि विविध कार्यक्रमात अनिक्षाशी भेट झाली, असेही अमृता म्हणाल्या. 27 जानेवारी 2023 रोजी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अनिक्षा तिथे भेटली व कार्यक्रम झाल्यावर अनिक्षाला कारमध्ये बसवले. तेथे अनिक्षाने संवाद साधताना माहिती दिली की, तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत होते. पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसे कमवू शकतो व कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसेही घेऊ शकतो. हा प्रकार लक्षात आल्यावर अमृता यांनी अनिक्षाला कारमधून खाली उतरवले. त्यानंतर एका रात्री अनिक्षाने फोन करून सांगितले की, तिच्या वडिलांना एका प्रकरणात आरोपी ठरवण्यात आले आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक कोटी रूपये देण्याची तयारी आहे. हे ऐकताच फोन कट करत आम्ही तिचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर 18 फेब्रुवारीला रात्री 11.55 ते 12.15 च्या दरम्यान 22 व्हिडीओ क्लीप, तीन व्हॉईस नोटस अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर आले. तिच्या वडिलांसोबत, ती महिला अप्रत्यक्षपणे अमृता यांना धमकी देत होती, असे अमृता यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा