धुळे– (bhule)मार्च महिन्याचा पगार अद्यापही न झाल्याने आज धुळे(mns) मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनासमोर एकत्र येत घोषणाबाजी केली. यावेळी कर्मचारी संजय अग्रवाल यांनी आत्मदहन करण्यासाठी सोबत पेट्रोलची बाटली आणली होती. त्यांनी ती आपल्या अंगावर ओतली मात्र धुळे शहर (police)पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची मदतीने मोठा अनर्थ टळला आहे. हादरलेल्या प्रशासनाने महापौरांच्या दालनात कर्मचाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन त्यांची समजूत काढली. तसेच शासनाकडून अनुदान प्राप्त होताच येत्या चार-पाच दिवसात पगार केले जातील, अशी ग्वाही देखील यावेळी दिली.
धुळे महानगरपालिकेतील सफाई विभागातील कर्मचाऱ्यांचा पगार वगळता सर्वच कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार रखडला आहे. परिणामी विविध सण,उत्सव साजरे करण्यापासून वंचित रहावे लागत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे व संतापाचे वातावरण आहे.
कर्मचाऱ्यांनी कालच धुळे मनपा आयुक्तांना दिवेदन देत १९ एप्रिलपुर्वी पगार करण्याची मागणी केली होती, अन्यथा १९ एप्रिल रोजी सकाळी (self-immolation)आत्मदहन करू, असा गंभीर इशारा दिला होता. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी आज सकाळी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर एकत्र येत घोषणाबाजी केली. यावेळी संजय अग्रवाल, नितीन जोशी, संदीप गवळी, प्रल्हाद जाधव, संगिता जांभळे, अनिल सुडके, राजेंद्र गवळी, जाकीर बागवान, श्रीकांत चव्हाण, मनोज जोशी, गोपाल साळुंखे, कैलास मासाळ, देविदास पाटील आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
आयुक्तांनी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या दालनात कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलाऊन घेतले. शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नसल्याने पगार रखडल्याचे सांगतानाच अनुदान होताच पगार केले जातील, असे कर्मचाऱ्यांना आश्वासित करण्यात आले. महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी कर्मचाऱ्यांच्या या कृत्याबाबत नाराजी व्यक्त करतानाच त्यांचा समाचार घेतला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घडलेल्या सर्व प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली.