अमरावती :(Amravati) विदर्भात दिवसेंदिवस (mercury of temperature)तापमानाचा पारा वाढत आहे. काल अमरावतीत दुपारी तीन वाजता 44 डिग्री तापमान होते. आजपासून अमरावती जिल्हासह विदर्भात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण असून विजेच्या कडकडासह पावसाचा इशारा अमरावती हवामान विभागाचे(Department of Meteorology) तज्ञ अनिल बंड यांनी दिला.आजपासून ढगाळ वातावरण असून सरासरी 41 ते 42 डिग्री तापमान राहणार असल्याची माहिती बंड यांनी दिली.