
(Amravti)अमरावती– अमरावतीच्या यशोदा नगर चौकात आजाद समाज पार्टी आक्रमक झाली असून दारू दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल प्रशासनाचा जाहीर निषेध केला गेला.
बडनेरा बायपासवरील यशोदा नगर चौकात आजाद समाज पार्टीचे रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी दारू दुकानाविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली.
महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या.दरम्यान, बडनेरा रोडवरील या आंदोलनाने वाहतूक थांबली, वाहनाच्या रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.