वरोरा तालुक्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
वरोरा. अवकाशातील जळत्या वस्तू जमिनीवर कोसळण्याची घटना एप्रिल महिन्यात घडली होती. त्यावेळी सर्वत्र खळबळ उडाली होती. विदर्भातील विविध भगांमध्ये या वस्तू आढळून आल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यात धातूची रिंग आणि धातूचा बलून आढळून आला होता. तशाच प्रकारची घटना पुन्हा घण्याची शक्यता आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील (Varora Taluka of Chandrapur District ) नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले (The administration appealed to be vigilant ) आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार अवकाशातून बलुन्स पडण्याची शक्यता (Balloons can fall from space) आहे. हैदराबाद येथील एक संशोधक हे काही संशोधन फुगे हे १ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या दरम्यान अवकाशात सोडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलेले आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैदराबाद या तेलंगना राज्यातील सुनील कुमार हे अवकाशामध्ये १ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ यादरम्यान काही संशोधन बलून अवकाशामध्ये सोडणार आहेत. काही कालावधीनंतर हे बलून जमिनीवर पडणार असून वरोरा तालुक्याच्या गावातील हद्दीत किंवा परिसरात हे बलून्स पडण्याची शक्यता राज्याच्या गृह विभागाने वर्तविली आहे. या आशयाचे एक परिपत्रक नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी वरोरा येथे पाठविले असून याबाबत तर्कवितर्क लावले जातात आहे. नागरिकांनी त्या बलून्सला छेडछाड न करण्याचे आवाहनसुद्धा केले आहे. अशा प्रकारचे बलून तालुक्यात कुठे आढळल्यास त्याला स्पर्श न करता तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
एप्रिल महिन्यात अवकाशातून काही वस्तु पडल्यांतर उल्कापात झाल्याची शंका उपस्थित केली गेली होती. नंतर मात्र हे साहित्य सॅटेलाईट बुस्टर रॉकेटचा पार्ट असल्याचे समोर आले होते.
हात लावण्यास मनाई
हे बलून नेमके कशाचे आहेत ? ते कोणत्या आकाराचे असतील किंवा ते किती घातक असू शकतात याबाबत कुठलीही स्पष्टता नसल्याने गावामध्ये अनावधानाने त्याला स्पर्श करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा बलुन्सला नागरिकांनी हात लावू नये, असे कळविण्यात आले आहे.
Balloons can fall from space)अवकाशातून पडू शकतात ‘बलुन्स’
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा