लवकरच अनेक बड्या नेत्यांचे भाजप प्रवेश, नावं ऐकून धक्के बसणार-बावनकुळे

0

औरंगाबाद : लवकरच अनेक बड्या नेत्यांचा भाजपप्रवेश होणार आहे. भाजपमध्ये प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार आहेत. धक्का बसेल असे प्रवेश होणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी केलाय. औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी शिवसेनेचे अनेक लोक शिंदेच्या संपर्कात असल्याचे सांगितले. दरम्यान, काँग्रेसचे नेते व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. बावनकुळे यांनी या संभाव्य घडामोडींचे संकेत दिले असल्याचे मानले जात आहे.
बावनकुळे यांनी सांगितले की, येत्या काही दिवसात भाजपामध्ये अनेक मोठे मोठे नेते येणार आहे. महाविकास आघाडीतील पक्ष रिकामे होतील. शिवसेनेचे अनेक लोक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे. अनेक नेते भाजपामध्ये येणार असून यात अनेक मोठी नावे आहेत. फक्त आता वेळ आणि ठिकाण ठरवायचे राहिले आहे. ती नावे ऐकल्यावर महाराष्ट्राला धक्का बसेल, असेही बावनकुळे म्हणाले. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीवरून शिंदे गट कुठेही नाराज नसल्याचा दावा बावनकुळे यांनीकेला. आपण रोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बोलत आहोत. सगळ्यांशी बोलूनच उमेदवार फायनल होत आहेत. त्यामुळे धुसफूस आमच्यात नाही, तर महाविकास आघाडीत आहे. नागपुरात काँग्रेसमध्ये वाद असून नाना पटोले त्यांच्या लोकांना घेऊन नागपुरात बसले असल्याचे बावनकुळे म्हणाले.


पावभाजी आणि कडबोळी | Kadboli -secret reciepe, Pavbhaji Recipe |Shankhnaad Khaddya Yatra Ep.no. 71

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा