मोठी बातमी :३०हून अधिक नक्षलवादी ठार

0

छत्तीसगडमधील नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर शुक्रवारी सुरक्षा दलाला मोठे यश आले. चकमकीत सुरक्षा दलाने ३० नक्षलवाद्यांना ठार केले. घटनास्थळावरून जवानांना मोठ्या प्रमाणात ऑटोमॅटिक शस्त्रे सापडली आहेत. नक्षलवाद्यांकडे एके ४७ देखील असल्याचे समोर आले आहे. या चकमकीनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आले आहे. चकमकीत सहभागी झालेले सर्व जवान सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

नक्षलवाद्यांसोबतची चकमक अबूझमाड येथे झाली. हा परिसर नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात सीमाभागात येतो. अबूझमाड क्षेत्रात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाच्या संयुक्त पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केले. दुपारी एकच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. उत्तरादाखल सुरक्षा जवानांनी कारवाई केली.