भाजप आक्रमक अजित पवारांचा पुतळा जाळला

0

नागपूर: बादशाह औरंगजेब आणि मोगल साम्राज्याशी दोन हात करीत धर्म आणि स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या छत्रपती संभाजी राजे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या निषेधार्थ भाजप राज्यभर आक्रमक झाली आहे .आज नागपुरातील मानेवाडा परिसरातील छत्रपती संभाजी राजे चौकात अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापटही झाल्याचे पहायला मिळाले. याशिवाय संविधान चौक येथे देखील भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या अजित पवार यांचा यावेळी धिक्कार करण्यात आला. या आंदोलनात आमदार मोहन मते, कृष्णा खोपडे,
संजय भेंड़े, पूर्व महापौर संदीप जोशी, दयाशंकर तिवारी,देवेन दस्तुरे,दिलीप गौर आदींनी मार्गदर्शन केले.


यावेळी विदर्भ संगठन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर,प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम,अर्चना डेहनकर, अश्विनी जिचकार, शहर महामंत्री संजय बंगाले,राम आंबुलकर, संघटनमंत्री सुनील मित्रा, शहर उपाध्यक्ष भोजराज डुंबे, अविनाश ठाकरे ,भारती बुंदे, मंगला खेकरे, स्वाती आखतकर, सुनील हिरणवार, विनोद कडू,मंडळ अध्यक्ष किशोर पलांदुकर, संदीप गवई, संजय चौधरी, , संजय अवचट, प्रमोदजी पेंडके,गुड्डू त्रिवेदी,श्रद्धा पाठक, राजेश हाथीबेड आदी सहभागी झाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा