२०२४ मध्ये भाजप आणि शिवसेना २०० प्लस जागा जिंकू – बावनकुळे

0

 

नागपूर : (NAGPUR)मुख्यमंत्री (EKNATH SHINDE)एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री (DEVENDRA FADNAVIS)देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने आणि पंतप्रधान (NARENDRA MODI)नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही १६४ आहोत पण २०२४ मध्ये २०० प्लस राहू. जनतेला अपेक्षित असं सरकार २०२९ पर्यंत तरी येईल.रस्त्यावर सही करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने भेटला आहे असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष (Chandrasekhar Bawankule)चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.एकनाथ शिंदे यांच्या सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राने प्रथमच पाहिला आहे. अडीच वर्ष तर उध्दव ठाकरे यांच्या खिशात पेन ही नव्हता.पण आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असे आहेत की, जिथे भेटेल तिथे जनतेचं समाधान होत आहे. बाजार समिती मध्ये सध्या पक्षीय राजकारण नाही.

सरकार आणि संघटन पुन्हा एकत्र काम करू आणि 148 जागा (ELECTION)निवडून आणू. शिवसेना भाजपचे जनतेला अपेक्षित असेलेल सरकार आणू.
सहकार खात्यात याची आघाडी त्याची आघाडी असते.कब्जा वैगेरे काही नसते. स्थानिक पातळीवर राजकारण नको. सत्ता गेली पन्नास, पन्नास लोक निघून गेले , संघटना हातून जात आहे माञ अजूनही सत्तेचा बाणा जात नाही. उध्दव ठाकरे यांना एका भुमिकेवर थांबता येत नाही.सत्तेत होते तेव्हा वेगळं मत आता विरोधक आहेत तेव्हा मतं बदलली असा टोला(UDDHAV THACKERAY) उद्धव ठाकरे यांना लगावला.

 

पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117