जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समिती मतदानाला सुरूवात

0
निवडणूक

गडचिरोली 🙁Gadchiroli) गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, अहेरी व सिरोंचा या पाच (Agricultural Produce Market Committee)कृषी उत्पन्न बाजार समिती असून यातील चार गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी आणि अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती (ELECTION)निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 8 वाजेपासून सुरवात झाली. 87 जागांचे भवितव्य आज ठरणार आहे. त्यासाठी 167 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 8 हजार 206 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे . प्रशासनाच्या वतीने मतदान बाबत नियोजन करण्यात आले असून त्यासाठी मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला.
गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा संकुल, गडचिरोली शाळेमध्ये सकाळी 8 वाजता पासून सुरुवात झाली. तर चामोर्शी, आरमोरी, अहेरी समितीसाठी त्या त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली. सकाळ च्या सत्रात अगदी बोटावर मोजता येईल एवढ्याच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 9 वाजेनंतर मतदारांची गर्दी उसळली आहे. चारही बाजार समितीच्या निवडणुकीचे मतदान संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार आहे.

अकोला जिल्हातल्या 7 पैकी 3 कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान

अकोला : (AKOLA)अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट आणि बार्शिटाकळी या तिन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या तिन्ही बाजार समित्यांमध्ये विविध मतदारसंघात 128 उमेदवार रिंगणात असून त्यांचे भाग्य आज मतपेटीत सीलबंद होत आहे. प्रत्येकी 18 संचालकपदाकरिता ही निवडणूक होत असून यामध्ये अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 32 उमेदवार रिंगणात होते.त्यापैकी 5 उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 60 पैकी 2 उमेदवार अविरोध होऊन आता 58 उमेदवार रिंगणात आहेत. बार्शिटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 40 उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत.या तिन्ही बाजार समितीकरिता मतमोजणी 29 एप्रिलला सकाळी 9 वाजता होणार आहे. यंदा या निवडणुकीत प्रथमच वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार उभे केले असल्याने य निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चिन्हे आहेत.
दरम्यान, 30 एप्रिल रोजी जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा, मूर्तिजापूर व पातूर या चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मतदान होणार आहे.. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये कोणाचा गुलाल उधळला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117

https://youtu.be/T_p7o-FkIY4