शिवसेनेची संपत्ती शिंदे गटाला देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली

0

नवी दिल्लीः(NEW DELHI) शिवसेना भवन, शिवसेनेचा निधी(EKNATH SHINDE) एकनाथ शिंदे गटाकडे सोपविण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून (Supreme Court rejected petition) लावली. ही याचिका फेटाळताना न्यायालयाने याचिकाकर्त्याला ‘याचिका दाखल करणारे तुम्ही कोण?’, असा सवालही केला. ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) घेतल्यावर शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात यावा, अशी याचिका वकील आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
आशीष गिरी(Ashish Giri)यानी न्यायालयात मागणी केली की, सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंना पक्षाचे अध्यक्ष म्हणून कायम ठेवले, तर शिवसना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्या. तसेच निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा. मी कोणत्याही पक्षाशी संलग्न नसून, याचिकेचा(SHINDE GROUP) शिंदे गटाशी संबंध नाही. एक वकील आणि मतदार असल्याने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. मी कायद्याच्या बाजूने आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला, तर सर्व त्यांना देण्यात यावे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला, तर त्यांना दिले जावे. मात्र, आता सर्व गोष्टींवर निर्बंध लागण्यात यावे, असा गिरी यांचा दावा होता.

 

 

पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117