भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

0

पुणे : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी पुण्यात निधन झाले. मागील काही महिन्यांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरु (Mukta Tilak Passes Away) होती ती अखेर आज संपुष्टात आली. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअरअँम्बुलन्सने मुंबईला नेण्यात आले होते. मुक्ता टिळक यांनी सन २०१७ ते २०१९ या काळात शहराचे महापौरपद भूषवले होते. पुणे महापालिकेत त्यांची उत्तम कामगिरी पाहता भाजपने त्यांना २०१९ मध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या आमदार झाल्या होत्या. २००२ साली मुक्ता टिळक यांनी पहिली निवडणूक लढवली. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांच्या नावावर आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा