खासदार राहुल शेवाळेंच्या एसआयटी चौकशीचे उपसभापतींकडून निर्देश

0

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार आणि गटनेते राहुल शेवाळे यांची एसआयटी चौकशीचे आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज दिलेत. ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी शेवाळेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्यांची मागणी मान्य करत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शेवाळेंच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. काल संसदेत राहुल शेवाळे यांनी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.


दिशा सालियन प्रकरणात सत्ताधाऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी सुरु होती. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून राहुल शेवाळे यांच्या एसआयटी चौकशीची मागणी पुढे करण्यात आली. एका महिलेने राहुल शेवाळे यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मात्र, पोलिसांचा तिच्यावर दबाव आहे, असा आरोप केल जात आहे. दरम्यान, शेवाळेंविरोधात एका प्रकरणात एसआयटी चौकशी नेमण्यात आली आहे. मग दुसऱ्या प्रकरणात एसआयटी चौकशी का नाही? असा सवाल करत मी सरकारला निर्देश देते की दुसऱ्या प्रकरणातही एसआयटी चौकशी करण्यात यावी, असे विधापरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आदेश दिले.