
नागपूरः अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. चौकशीच्या या घोषणेमुळे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची (Disha Salian death, SIT enquire ordered) शक्यता व्यक्त होत आहे. काल संसदेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेला आला. दिशा सालियान प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलीस करत होते. सीबीआयने याची चौकशी केली नाही. दिशाच्या कॉलमध्ये ‘एयू’ या नावाचे कोण आहे, हे समोर आले पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी विधानसभेत केली होती. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, असेही राणे म्हणाले.
दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशी होणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. दिशा सालियान प्रकरणी सीबीआय चौकशी झालेली सीबीआयने केवळ सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केला, असे फडणवीस यांनी सांगितले. राजकीय अभिनिवेश न ठेवता ही चौकशी केली जाईल, यात कुणालाही टार्गेट केले जाणार नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले
तत्पूर्वी, विधानसभेचे कामकाज या मुद्यावर प्रभावित राहिले. विरोधी पक्षांच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या चौकशीचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. या मुद्यावर चर्चा करावी, अशी मागणी पटोलेंनी केली होती. मात्र, त्यानंतर दिशा सालियान प्रकरण सभागृहात उपस्थित झाले. दिशा सालियान प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, पोस्ट मॉर्टम रिपोर्ट गायब करण्यात आला, त्या इमारतीत कोण कोण होते, याचीही माहिती गायब करण्यात आली, असा आरोप भाजपच्या सदस्यांकडून करण्यात आला.