नागपूर जिल्ह्यात भाजपची आघाडी

0

नागपूर  NAGPUR  – नागपूर जिल्ह्यातील 357 आणि 5 ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपने अनेक जागी मुसंडी मारल्याचे पहिल्या टप्प्यात दिसत असून महायुती आणि मविआत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. BJP भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  Chandrasekhar Bawankule यांनी आतापर्यंत 357 पैकी100 जागी भाजपने विजय मिळविल्याचा दावा केला आहे. हिंगणा तालुक्यातील लोणारा येथे काँग्रेसला मात देत 8 जणांचे भाजपचे पॅनल निवडून आल्याने सरपंचाची घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली.

आ समीर मेघे यांच्यासाठी हा मोठा विजय आहे. सर्वाधिक चुरशीच्या काटोल नरखेड विधानसभा मतदार संघात भाजप,अजितदादा पवार गट आणि दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (शरद पवार गट) यांनी दावे-प्रतिदावे केले आहेत. आतापर्यत १७ निकाल हाती आले असून यापैकी १५ ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख गटाची एक हाती सत्ता आल्याचा दावा देशमुख यांनी केला. यात काटोल तालुक्यातील ८ पैकी ७ तर नरखेड तालुक्यातील ८ पैकी ७ ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख गटाने दावा केला आहे.बाजारगाव ग्राम पंचायतीवरही अनिल देशमुख गटाने दावेदारी सांगितली आहे. दरम्यान, या ठिकाणी काका-पुतण्याची जोरदार लढाई होती.

भाजपने मोगरा, बानोर, खरसोली (अजित पवार गट), कामठी तालुक्यात भाजपने मुसंडी मारली. भाजपचे माजी आमदार व निवडणूक प्रभारी डॉ आशीष देशमुख, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या उपस्थितीत जल्लोषही साजरा करण्यात आला. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या घरी, जनसंपर्क कार्यालयासमोर ढोलताशांचा गजर, जल्लोष पहायला मिळाला.

बीआरएसने भंडारा जिल्ह्यात तर मनसेने नागपूर जिल्ह्यात झेंडा रोवला. जिल्ह्यात सरासरी 80 टक्के मतदान
रविवारी दि.5 नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरासरी 79.40 तर 5 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांसाठी सरासरी 67.27 टक्के मतदानाची नोंद झाली.