इगतपुरीच्या जिंदाल कंपनीत स्फोट

0

एका महिलेचा मृत्यू ; 14 जखमी, चार गंभीर


नाशीक. इगतपुरीच्या मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत (Jindal Company near Mundhegaon of Igatpuri ) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली. आगीमुळे कामगार कंपनीतच अडकून पडले होते. 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले (14 workers have been rescued) आहे. जखमी झालेल्या ९ रुग्णांना नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील एका महिलेचा मृत्यू (Death of a woman ) झाला आहे. चार रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून चार रुग्णांचा धोका टळला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. आग विझवण्यासाठी नाशिक येथील अग्निशमन दलाचे 7 मेगा बाऊजर बंब जिंदाल कारखान्यात दाखल. तसेच हायड्रोलीक शिडी असलेला बंब ही घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसेच अंबड व सिन्नर एमआयडी सीतून अग्निशमन दलाचे बंब आले आहेत.
जिल्हा रुग्णालयातील २५ डॉक्टर, परिचारिकांच्या पथकाने उपचाराची तयारी केली असून जखमींवर उपचारासाठी वैद्यकीय पथक सज्ज आहे. जिंदल कंपनीतील स्फोटाची भीषणता लक्षात घेऊन डॉक्टर्स परिचारिका वॉर्ड बॉय आदी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली आहे.
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महामार्गावरूनदेखील या आगीच्या धुराचे लोट दिसत आहेत. या कंपनीत एक हजारांहून अधिक कामगार आहेत. जिंदाल कंपनीत सद्य परिस्थितीत 40 अंबुलन्स आणि 12 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. सुयश हॉस्पिटलमध्ये १५ रुग्ण दाखल झाले आहेत. पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी रुग्णाची भेट घेऊन चौकशी केली. मंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्हाधिकारी, आयुक्त आसे सर्वच बडेअधिकारी घटनास्थळी हजर आहेत. मुख्यमंत्र्यांकडून सतत माहिती घेण्यात आली आहे. तेसुद्धा घटनास्थळी पोहोचण्याची शक्यता आहे. नवीनवर्षाचा पहिला दिवस असल्याने कामगारांची संख्या कमी होती. यामुळे जखमींची संख्या कमी असल्याचे सांगितले जात आहे. आग विझविण्यासोबतच आत कुणी अडकून पडले असल्यास त्याला बाहेर काढण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरू आहे.
संबंधित प्लॅस्टिकचे साहित्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय रसायनाचे टँकरही आहेत. एका भल्यामोठ्या टँकरमध्ये डिझेलचा साठाही आहे. आग तिथपर्यंत पोहोचल्यास आणखी मोठा स्फोट होण्यासह आग झपाट्यान पसलण्याची शक्यता आहे. यामुळे या परिसरातून सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा