
बुलढाणा – (buldhana)अनेक महिन्यापासून सुरू गोरखधंदा सुरू असलेल्या शहरातील एका हॉटेलमध्ये रूग्णांवर उपचार करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना (city police)शहर पोलिसांनी आज ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणावर औषध साठा जप्त करण्यात आला.या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.विकमशी चौकातील एका लॉजच्या खाली असलेल्या हॉटेलात बोगस डॉक्टरांकडून रूग्णांवर उपचार सुरू असल्याची तक्रार (Department of Health)आरोग्य विभागाकडे करण्यात आली होती.. यावरून सामान्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. यानंतर पोलीस व सरकारी वैद्यकीय अधिकारी पथक आज दुपारी विकामसी चौकातील लॉजच्या खाली एका हॉटेलमध्ये(patients) रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या ठिकाणी पाेहोचले.. त्यानंतर शहर पोलीसांच्या पथकाने दोन डॉक्टरांसह येथून मोठ्याप्रमाणात औषधसाठा जप्त केला.दोन्ही डाॅक्टरांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. पोलीस सुत्रानुसार महाबीरसिंह मांगे सिंह आणि अरविंद कुमार ब्रिजपाल अशी(arrested) अटक केलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. शहर पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पंकज सपकाळे आणि शहर पोलीसांनी ही धडक कारवाई केली. या दोघांकडून पावडर व गोळ्या, औषधी जप्त करण्यात आली. वैद्यकीय (Officer Prashant Wankhade)अधिकारी प्रशांत वानखडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.