बाबा जुमदेवजी यांची शोभायात्रा – जयंतीनिमित्त हुडकेश्वर गट क्रमांक 10 चे आयोजन

0

नागपूर : (nagpur)मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी(baba jumdev) बाबा जुमदेवजी यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्ताने परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगरच्या आदेशान्वये परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ गट क्र. १० हुडकेश्वर बुथ यांच्या वतीने हुडकेश्वर (बु.) येथून हजारो सेवक सेविकांच्या उपस्थितीत आणि विविध चित्र रथासह ढोल ताशाच्या गजरात शिस्तबद्ध पध्दतीने(procession) शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे ठिकठिकाणी सेवक सेविकांकडून स्वागत करण्यात आले.
अंधश्रध्दा निर्मुलन, व्यसनमुक्त समाज तसेच आदर्श मानव घडवून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा (baba jumdev)बाबा जुमदेवजी यांनी दिली. मार्गदर्शक गोविंदराव सोनवाने, रामाजी भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली व दशरथ ठाकरे, लक्ष्मण गोंडाणे, जागेश्वर कुंभारे यांच्या नेतृत्वात रविवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘महाराष्ट्रीयन बाणा असलेला फेटा घालून तरुणी व महिलांचे लेझीम पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते’. (the drummers)ढोलताशांच्या गजरात बँड व डीजेवरील बाबा जुमदेवजीच्या गाण्यांवर महिला व तरुणाई बेधुंद होऊन नाचत गात बाबांच्या नावाचा जयघोष करीत होती. मार्गावर विविध संस्थांच्या वतीने आणि सेवकांकडून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हुडकेश्वर (बु.) येथून सुरु झालेली ही शोभायात्रा म्हाळगीनगर, सुभेदार लेआऊट, दत्तात्रयनगर, भांडे प्लॉट चौक, नंदनवन, टेलिफोन एक्सचेंज चौक असे मार्गभ्रमण करुन वर्धमान नगर येथील (Manav Temple)मानव मंदिरात पोहचली. या शोभायात्रेत हजारो सेवक सेविकांनी सहभाग घेतला होता.

तत्पूर्वी हुडकेश्वर रोड शिवांगी नगर येथे मार्गदर्शक गोविंदराव सोनवाणे यांच्याकडे थंड पाण्याच्या प्याऊचे उद्घाटन करण्यात आले. टेलिफोन एक्सचेंज चौक येथे गट क्र. १० च्या वतीने बाहेर गावावरून येणाऱ्या सेवक सेविकांसाठी १५०० किलोंच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. आणि सायंकाळी हुडकेश्वर (बु.) येथे हजारो सेविकांसानी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

भेलपुरी पापड कोन चाट आणि छोले चॅट रॅप | Bhelpuri Papad Cone Recipe|Chhole Chaat Stuffed Roll |EP-106