नागपुरात मविआची 16 रोजी सभा , सर्वाधिक गर्दी होणार सुनील केदार, वडेट्टीवार यांचा दावा

0

नागपूर : (nagpur)नागपुरात येत्या 16 एप्रिल रोजी पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर महाविकास आघाडीची दुसरी जाहीर सभा होत आहे. आज या सभेसाठी सायंकाळी (KDK COLLAGE)केडीके कॉलेजमध्ये पूर्वतयारीची सभा पार पडली. यावेळी अपेक्षेनुसार प्रदेशाध्यक्ष (NANA PATOLE)नाना पटोले नव्हते. माजी मंत्री (SATISH CHATURVEDI)सतीश चतुर्वेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मविआचे नेते, पदाधिकारी होते. उपमुख्यमंत्री (DEVENDRA FADNAVIS)देवेंद्र फडणवीस यांच्या कर्मभूमीत ही सभा रेकॉर्डब्रेक अशी होईल.जनता (BJP)भाजप सरकारच्या एकंदर कारभाराला कंटाळली असल्याचा दावा माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार,आ. सुनील केदार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
केदार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले,ज्या जिल्हयात (ZP)झेडपी,शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत आम्ही निवडणून येतो तो भाजपचा गड कसा? ही सभा शक्तीप्रदर्शन नाही, लोकांचे प्रेम दाखविणारी आहे. विशिष्ट असे टार्गेट नसले तरी सर्वाधिक मोठी सभा राहणार आहे
विजय वडेट्टीवार म्हणाले,

महाविकास आघाडीच्या सभांना राज्यात सुरवात झाली आहे, दुसरी सभा नागपुरात होणार आहे,
आजच्या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व नेते व पदाधिकारी उपस्थित होते, सभेचे मुख्य संयोजक म्हणून(SUNIL KEDAR) सुनील केदार यांची नियुक्ती केली आहे, प्रत्येक जिल्ह्यात समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा यशस्वी करणार, राज्य सरकारच्या धोरणांवर हातोडा मारणारी ही सभा ठरणार आहे. यावेळी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित राहणार असून संभाजीनगरला नसले तरी विदर्भाचे असल्याने नागपूरच्या सभेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये एकमेव आवाज बोंबाबोंब करताना दिसत आहे आणि तो म्हणजे बावनकुळे यांचा आवाज आहे. सत्ता हातून जायला लागते तेंव्हा गोमूत्र,गाय,सावरकर आठवतात. न्यायालयाने नपुंसक म्हणण्याची पाळी आली ,खरतर त्यांच्यावरच गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे.
मविआच्या सभेत (UDDHAV THACKRY)उद्धव ठाकरे खुर्ची प्रश्नी बोलताना आमच्याध्ये कुणाची खुर्ची मोठी,कुणाची छोटी हे आम्ही ठरवू, त्यांनी का बोलावे, हा आमचा प्रश्न आहे असे ते म्हणाले.

 

 

भेलपुरी पापड कोन चाट आणि छोले चॅट रॅप | Bhelpuri Papad Cone Recipe|Chhole Chaat Stuffed Roll |EP-106