स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा उद्या नागपुरात समारोप -सहाही विधानसभा मतदार संघातून निघणार बाईक रॅली

0
  1. नागपूर  :स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा उद्या मंगळवारी नागपुरात सायंकाळी 7 वाजता शंकर नगर चौक येथे समारोप होत आहे. तत्पूर्वी नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघातून ढोलताशांच्या निनादात स्वतंत्रपणे बाईक रॅलीच्या स्वरूपात ही गौरव यात्रा निघणार असून यानंतर सर्वजण नेते,पदाधिकारी पायी चालत सभास्थळी येतील. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. 30 मार्चपासून ही यात्रा राज्यभरात सुरू आहे. पूर्व विदर्भात 32 सभा 56 कार्यक्रम यानिमित्ताने होत असल्याची माहिती गौरव यात्रा समितीचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी संयुक्तपणे पत्र परिषदेत दिली दिली. काँग्रेस,राहुल गांधीविरोधात यानिमित्ताने ठराव केला जण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न सन्मान दिला जावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काँग्रेसने राहुल गांधी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह विधान केले. महाराष्ट्राचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टीने सावरकर गौरव यात्रा काढली. उद्या सावरकर यांच्या पुतळ्याजवळ यात्रेचा समारोप होईल. नागपुरातील सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता पूर्व नागपूरमधून आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार प्रा अनिल सोले, उत्तर नागपूरमधून प्रा संजय भेंडे, माजी आमदार मिलिंद माने,पश्चिम नागपूरमधून माजी आमदार सुधाकर देशमुख, संजय बंगाले,विनोद कन्हेरे, दक्षिण पश्चिम नागपूरमधून शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, किशोर वानखेडे तर दक्षिण नागपुरातून आमदार मोहन मते, भोजराज डुंबे,देवेंद्र दस्तुरे आणि मध्य नागपुरातून आमदार विकास कुंभारे,माजी आमदार गिरीश व्यास माजी महापौर दयाशंकर तिवारी आदींच्या नेतृत्वात ही यात्रा स्वतंत्रपणे काढण्यात येईल. सर्व यात्रा शंकर नगर येथे सायंकाळी पोहोचतील. समारोप प्रसंगी व्यासपीठावर राजे मुधोजी भोसले, गोंड राजे वीरेंद्र शहा, राष्ट्रसेविका समिती प्रमुख शांतक्का, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, खासदार कृपाल तुमाने,माजी खासदार अजय संचेती, विकास महात्मे जयदीप कवाडे आदी अनेक मान्यवर उपस्थित राहतील असे सांगण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रा संजय भेंडे, धर्मपाल मेश्राम, प्रवक्ते चंदन गोस्वामी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.