नागपूर. साधारण 32 वर्षापूर्वी दहावीतील सर्व मित्र-मैत्रिणींना परत एकदा एकत्र (Friends meeting after 32 years) त्याच वर्गखोलीत बसून परत तेच जुने दिवस आठवण्याचा अनुभव कोराडी येथील विद्यामंदीर शाळेतील (Vidya Mandir School in Koradi ) 1990 च्या ‘दहावी अ’च्या विद्यार्थ्यांनी नुकताच घेतला, एव्हढेच नव्हे तर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत (Bringing back old memories ) या विद्यार्थ्यांनी आयुष्यभर मैत्री कायम ठेवण्याचा देखील संकल्प केला. मैत्री हा शब्द अगदी स्टिरियोटाइप वाटतो, पण बाल मित्रांना या दोन शब्दांमागील भावना, तीव्रता समजते. जिथे आपण या जगाला सामोरे जाण्यासाठी पावले टाकायला शिकलो. मोठे झालो, हा प्रवास बाल आणि शाळकरी मित्रांमुळे सुंदर आणि संस्मरणीय ठरला आहे. जिथे या जगाला सामोरे जाण्यासाठी पावले टाकायला शिकले, हा प्रवास सहकाऱ्यांमुळे सुंदर आणि संस्मरणीय ठरला. त्यामुळे शाळेतील सोबत्यांना भेटण्याची संधी मिळाली, जी मी सोडणार नाही, याभावनेने सारे विद्थार्थी एकत्र आले होते.
विद्यामंदीर शाळेतील 1990 च्या ‘दहावी -अ’च्या तुकडीतील बहुतांश विध्यार्थी सर्वसामान्य घरातील होते. दहावी झाल्यानंतर प्रत्येकाने साजेशी प्रगती करीत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली, आज यापेकी कुणी प्रथितयश डॉक्टर, अभियंते, लेखक, पत्रकार, अधिकारी, उद्योजक व व्यावसायिक आहेत तर अनेकांनी राजकारणात देखील मानाचे स्थान मिळविले आहे. आपसातील लहान-मोठा, गरिब श्रीमंत हा भेदाभेद विसरुन जवळपास 40 विध्यार्थी आणि विध्यार्थीनी या सावनेर जवळील शिवतिर्थ येथे एकत्रित आले होते. माझी शाळा – माझा अभिमान, माझे मित्र माझे सामर्थ्य. या भावनेने उजाडलेल्या एका उनाड दिवसाचा प्रारंभ झाला तो शाळेतील वर्गखोलीतून. सगळ्यांना भेटून, एकमेकांची ओळख करून आणि चिडवत बसने हा प्रवास सुरू झाला. आपण एकमेकांना ओळखू शकू का, 32 वर्षानंतर एकमेकांशी काय बोलणार अशी शंका काहींना होती. परंतु, हे मित्र भेटले… तेव्हा, 1990 च्या काळामध्ये सर्व परत आले होते. आपण पन्नाशीच्या जवळ आहोत, हे सत्य स्वीकारायला कोणीही तयार नव्हते. प्रत्येकजण अजूनही स्वत:ला तरुण समजून वागत होता.
Bring back old memories तब्बल 32 वर्षांनंतर यारांची गाठभेट विद्यामंदीरचे विद्यार्थी शाळेत परतले : जुन्या आठवणींना उजाळा
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा