नाशिक : खासदार संजय राऊत यांच्यावर नाशिक आणि ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर संतापलेल्या राऊत यांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बदनामीकारक उल्लेख केल्याची तक्रार असून ठाणे आणि नाशिक अशा दोन ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या होत्या. नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात तर ठाण्यातील नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे (Offence against Sanjay Raut in Thane, Nashik). राऊत यांच्या विरोधात ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांच्या विरोधात रविवारी संध्याकाळी आंदोलन करण्यात आले व त्यानंतर पोलिस तक्रार दाखल करण्यात आली.
नाशिक शहरात असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून भादंवी कलम ५०० प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चाटूगिरी असा शब्द वापरला. त्यांनी मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचाही आरोप आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना गद्दारांनी चोरली अशी टीका करताना चिन्ह आणि नाव पळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांमध्ये सौदा झाल्याचा आरोपही राऊत यांनी केलाय. यानंतर आता संजय राऊत अडचणीत सापडले असून त्यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी