नक्षलवाद्यांचा हल्ला, 2 जवान शहीद

0

महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवरील घटना
गोंदिया. महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत (Maharashtra-Chhattisgarh state border ) असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलिस चौकीअंतर्गंत आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास नक्षवाद्यांनी चहा पिण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला (The Naxalists attacked the policemen who had gone to drink tea) केला. या घातपाती कारवाईत दोन पोलिस शहीद झाले. तर एक जवान जखमी झाला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून जंगलात सर्चिंग सुरु केली आहे. महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यालगत अवघ्या 1 किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या चेकपोस्ट परिसरात ही घटना घडली. बोरतलाव पोलिस चौकीत नियुक्त हवालदार राजेश प्रतापसिंह व जवान ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चहा पिण्याकरीता पोलिस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्याकडे गेले होते. आधीच त्या परिसरात दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी यांच्यावर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिसरा जखमी असून जखमी शिपायामुळेच सदर घटना पोलिसांना कळली.
छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यात ही घटना घडल्यानंतर खबरदारी म्हणून गोंदिया जिल्ह्यातील सीमेवर सी -60 जवान आणि पोलिसांची अधिकची कुमक तैनात करण्यात आली आहे. सिमेवरील नक्षल्यांच्या प्रत्येक हालचालीवर गोंदिया पोलिसांनी पाळत ठेवली आहे.
पोलिसांची मोटारसायकल भस्मसात
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलप्रवण क्षेत्र असल्याने या भागात नियमित गस्त घातली जाते. त्यासाठीच तिन्ही जवान मोटारसायकलने चेकपोस्ट परिसराकडे निघाले होते. जवळच एक ढाबा आहे. याठिकाणी चहा घेऊन ते पुढे निघणार होते. ते ढाब्याजवळ उभे असतानाच अचानक नक्षलवादी पोहोचले. बेछुट गोळीबार सुरू केला. जवानांकडे कोणतेही शस्त्र नसल्याने त्याचा प्रतिकार तोकडा पडला. गोळीबारामुळे दोन जवान जागेवरच शहीद झाले तर एक गंभार जखमी झाला. घटनेनंतर नक्षलवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची मोटारसायकलही पेटवून दिली. त्यानंतर ते जंगलात पसार झाले. ही घटना पुढे आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सीमेलगत ही घटना घडली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पाळत वाढविली गेली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा