chhagan bhujbal ओबीसी प्रदेशाध्यक्ष व्हावा -छगन भुजबळ यांची मागणी

0

 

मुंबई Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये obc ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष करा अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते chhagan bhujbal  छगन भुजबळ यांनी मागणी केली.आमचा पक्ष लोकशाहीने चालणारा पक्ष आहे.प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. ajit pawar अजित पवार यांना वेगळे पद किंवा काम करायच आहे पण ते पक्षातच काम करणार आहेत.मला फक्त 4 महिने अध्यक्षपद मिळाले मी माझे मत मांडले.

भाजपने बावनकुळेसारख्या ओबीसी नेत्याला अध्यक्ष केले.काँग्रेसने सुद्धा दिला. यामुळेच आमच्या पक्षातसुद्धा ओबीसी नेते आहेत त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे.तटकरे, मुंडे , आव्हाड अनेकजण आहेत मला दिले तर मी सुद्धा काम करेल छोट्या समाजाला अध्यक्षपद दिले पाहिजे असं मला वाटते यावर भुजबळ यांनी भर दिला.विरोधी पक्षनेतेपद जर मराठा समाजाकडे असेल तर अध्यक्षपद ओबीसी किंवा लहान समाजाकडे हवे,जो नेता प्रदेशाध्यक्ष करायचा त्याचा निर्णय शरद पवार घेतील.
बीआरएस सगळीकडे पोहचत आहेमहाविकास आघाडीच्या मतदारांमध्ये फूट पडू नये यासाठी सावध राहणं गरजेचे आहे.