(Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यानिमित्त राजकीय घडामोडींना वेग
शनिवारी भंडाऱ्यात कोटींच्या कामाचे भूमिपूजन

0

भंडारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) शनिवारी १२ नोव्हेंबरला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर (On a visit to Bhandara district) येत आहे. मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर शिंदे प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. २०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन (Bhoomipujan of development works worth 200 cr.) त्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकारांना दिली. शिंदे गोसेखुर्द प्रकल्पालासुद्धा प्रत्यक्ष भेट (visit to the Gosekhurd project as well) देऊन पाहणी करणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनाही वेग दिला गेला आहे. अलिकडेच पूर्व विदर्भातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. अधिकाधिक पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात ओढण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यांच्या भेटीदरम्यान महत्त्वाच्या व्यक्तींचा पक्षप्रवेश व्हावा यादृष्टीनेही हालचाली सुरू असल्याचे कळते. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहेत. शिवाय त्यांच्याकडून भंडारा जिल्ह्यासाठी मोठी घोषणाही केली जाऊ शकते.
भोंडेकर यांनी सांगितले की, १२ नोव्हेंबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आगमन भंडारा येथे होत आहे. भंडारा जिल्ह्याच्या विकासाकरिता मुख्यमंत्री कटिबद्ध आहेत. विधानसभा क्षेत्रातील बुद्ध विहारात अधात्म्य सोबत शिक्षणाची साथ मिळावी याकरिता अत्याधुनिक ईलायब्ररी व शाळांचे आधुनिकीकरण सोबतच क्षेत्रातील रुग्णालयांना सुविधा देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री यांच्या हस्ते भंडारा शहरातील नाशिक नगरातील बुद्ध विहारातील ई. लायब्ररीचे उद्घाटन, शास्त्री चौक येथील हुतात्मा स्मारक, खांब तलाव सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन करण्यात येईल.
त्यानंतर खात रोड स्थित रेल्वे मैदानात सभेचे आयोजन केले असून, याअगोदर भूमिगत गटारी योजनेचे भूमिपूजन केले जाईल. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले आहे. या वेळी शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल गायधने आणि शहर अध्यक्ष मनोज साकुरे उपस्थित होते.
दौरा शासकीय स्वरुपाचा असला तरी या दरम्यान राजकीय घडामोडीही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. नवीन पदाधिकारी त्याभागातील लोकप्रतिनिधींचा बाळासाहेबांची शिवसेना गटात समावेश होऊ शकतो काय, यासंदर्भातील चाचपणी सुरू झाली आहे. काहींनी त्यासाठी तयारीही दर्शविली असल्याची माहिती पुढे येत आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा