चीनचे घुसखोरीचे प्रयत्न आमच्या सैनिकांनी हाणून पाडले-संरक्षणमंत्री राजनाथसिंह

0

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशात तवांग येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचा मुद्द्यावर मंगळवारी संसदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh on Tavang incidence) यांनी संसदेत उत्तर दिले. (Rajnath Singh on Tawang Clash) चीनने 9 डिसेंबर रोजी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चीनी सैनिकांना आपल्या सीमेत परतावे लागले लागले. यावेळी झालेल्या हाणामारीत दोन्ही बाजूचे सैनिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून चकमकीत एकही भारतीय जवान शहीद झालेला नसल्याचे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपले लष्कर कटिबद्ध आणि सज्ज आहे असून आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असल्याची ग्वाही त्यांनी दिली. चीनच्या तवांगमधील घुसखोरीवरून विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली. ९ डिसेंबरला घुसखोरीचे प्रयत्न झाले असताना सरकारने ही बाब दडवून का ठेवली, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित होत आहे. सरकारने या मुद्यावर स्पष्टीकरण द्यावे, या विरोधकांच्या मागणीवर मंगळवारी दुपारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्टीकरण दिले. राजनाथसिंह म्हणाले की, मला खात्री आहे की हे सभागृह आपल्या सैन्याच्या शौर्याला आणि धैर्याला एकमताने पाठिंबा देईल. राजनैतिक पातळीवरही चीनला स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. 9 डिसेंबर रोजी पीएलएच्या सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात घुसखोरी केली. भारतीय जवानांनी त्यांच्याशी सामना करून त्यांना हुसकावून लावले व चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, वायुसेना परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे वायुसेनेच्या वतीने सांगण्यात आले.

जोधपुरी गुलाबजामची भाजी आणि कणकेचे वांगे रेसिपी|Gulab Jamun Ki Sabji & kankiche Wangi Recipe|Epi. 52

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा