जणुकीया बदलाचा परिणाम : ताडोबाच्या जैवविविधतेत भर
_____________________________________________________________________________________
चंद्रपूर CHNDRAPUR : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात (Tadoba Tiger Reserve) दुर्मिळ वनस्पतींसह प्राण्यांचा अधिवास आहे. वाघांच्या विपूल संख्येसोबतच जैवविविधतेसाठीही हे जंगल ओळखले जाते. याच जंगलात अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या काळा बिबट्याचे वास्तव्यही आढळले होते. त्या पाठोपाठ आता पांढरे हरीण (White deer ) देखील आढळले आहे. ही वन्यजीव प्रेमींना सुखावणारी घटना ठरली आहे. पोभुर्णा तालुक्यातील केमा –देवई मार्गावर (
) हे हरीण आढळले. वाटसरुंना रस्त्याच्या कडेला हे दुर्मिळ हरीण दिसले. त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे. तो झपाट्याने व्हायरल होत असून वन्यप्रेमी या हरणाला बघण्यासाठी आतूर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. फोटो अस्पष्ट असल्याने दिसणारा प्राणी हरीणच आहे किंवा अन्य ते अद्याप अस्पष्ट असले तरी ते पांढरे हरीणच असल्याचा दावा केला आहे. यापूर्वीसुद्धा अनेक पर्यटकांनी ताडोबाच्या जंगलात पांढरे हरीण दिसल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याचे प्रमाण कुणालाही सादर करता आले नाही.
पांढरे हरीण म्हणजे काही चमत्कार वैगेरे नाही. अशा हरणांना अल्बिनोस (पांढरे ) हरीण संबोधले जाते.
जनुकीय दोषामुळे असा प्रकार घडत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यांच्यामते हजार हरिणांपैकी एकामध्ये ‘अल्बिनोस’ची लक्षणे दिसू शकतात. ‘अल्बिनिझम’ अत्यंत दुर्मिळ आहे. दोन वर्षांपूर्वी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात असेच पांढऱ्या रंगाचे हरीण आढळले होते. या हरिणांची संख्या स्वीडनच्या वेस्ट वर्मलँडमध्ये 50 च्या जवळपास आहे. एखाद्या प्राण्याच्या शरीरात मेलेणीनचे प्रमाण कमी झाले तर तो प्राणी पांढरा दिसतो. या उलट चंद्रपूरमध्ये पिवळ्या ऐवजी काळा बिबट पाहिला आहे. हासुद्धा जणूकीय दोषाचाच परिणाम आहे.
त्यामुळे चंद्रपूर मध्ये पांढरे हरीण आढळले तर नवल वाटायला नको, असे वन्यजीव अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांचे म्हणणे आहे. चंद्रपूर जिल्हातच गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा गावातील येलमुले यांच्या मालकीच्या म्हशीने पांढऱ्या रेडकुला जन्म दिला होता. हा रेडकूसुद्धा कुतूहलाचा विषय ठरला होता. मात्र, तीन दिवसातच त्याचा मृत्यू झाला.