वानाडोंगरीत कॉलेजची स्लॅब पडली, सुरक्षा रक्षकांचा मृत्यू

0

 

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा वानाडोंगरी येथे मेघे समूहाच्या नवीन कॉलेजच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने एका सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाल्याची घटनाआज शनिवारी दुपारी घडली.
मेघे ग्रुपच्या एसओएस कॉलेज मधील ही घटना असून या घटनेत मलब्याखाली दबून सुरक्षा रक्षक रवींद उमरेडकर यांचा मृत्यू झाला.मेघे ग्रुपच्या स्कूल ऑफ स्कॉलर्स नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते आज अचानक स्लॅब चा काही भाग कोसळला पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.